Alandi : आमदार किशोर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाच्यावतीने आळंदी पोलीस स्टेशनमध्ये निवेदन

एमपीसी न्यूज – पाचोरा येथील ( Alandi ) पत्रकार संदीप महाजन यांना अर्वाच्य शिवीगाळ करून जिवी मारण्याची धमकी देणारे आणि गुंडाकरवी हल्ला करणारे आमदार किशोर पाटील  यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याबाबत हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ यांच्या वतीने  आज दि.12 रोजी आळंदी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे  यांना निवेदन देण्यात आले.

Pune Metro : पुणे मेट्रो लवकरच सकाळी 6 वाजता धावणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

यावेळी हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे अध्यक्ष अर्जुन मेदनकर,  उपाध्यक्ष एम डी पाखरे, हल्ला विरोधी समिती निमंत्रक अविनाश राळे, सुनील बटवाल, अनिल जोगदंड सामाजिक कार्यकर्ते राहुल चव्हाण व सचिन शिंदे उपस्थित ( Alandi ) होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.