Alandi : आळंदीमध्ये पुन्हा अवेळी पाणीपुरवठा; नागरिकांचे संतप्त सवाल

एमपीसी न्यूज : आळंदीमध्ये खेड विभाग व हवेली विभाग असा (Alandi) दिवसा आड पाणीपुरवठा चालू आहे. मागील काही दिवसांपासून परत शहरात अवेळी पाणीपुरवठा चालू आहे. त्यात दि.13 रोजी(काल) रोटेशननुसार खेड विभागात पाणी पुरवठा झाला पाहिजे होता. तो उशिरा रात्री पर्यंत झालेला नव्हता.

सलग दोन दिवस पाणी आळंदी- खेड विभागात नसल्याने तिथे पाणीटंचाई समस्या निर्माण होऊन काही नागरिकांनी विकत टॅंकर द्वारे पाण्याची सुविधा केली तर काहींनी आजूबाजूच्या छोट्या मोठ्या कुपनलिकेचा आधार घेत पाण्याची सुविधा केली.

मागील डिसेंबर महिन्यात काही दिवस व सद्यस्थितीत सुद्धा पुन्हा अवेळी पाणीपुरवठा होत आहे. तसेच सलग दोन दिवस पाणी पुरवठा खेड विभागात झाला नसल्याने पुन्हा नागरिक हैराण झाले आहेत.

गुरुवारी आळंदीत पाणी पुरवठा झाल्या नंतर आळंदी गावठाणात (Alandi) अजूनही पाणी पुरवठा झाला नाही याला जबाबदार कोण? यावर कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार? असे सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर कुऱ्हाडे यांनी मत मांडले.

Today’s Horoscope 14 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

तर नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना फोन केला तर आज येईल उद्या येईल अशी उडवाउडवीची उत्तरे देतात. सोशल मिडीयाच्या माध्यमातून पाण्याची वेळ पण सांगत नाही.

गावठाणापेक्षा नदीपलिकडे पाणी सोडण्याचे प्रमाण जास्त आहे. गावठाणावर येवढा अन्याय का? असे मत सोशल मिडीयाच्या माध्यमातून मंगेश तिताडे यांनी मांडले.

रविवार(दि.14) सकाळी 6 वाजल्या पासुन गावठाण(खेड) भागात पाणी पुरवठा होईल. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. अशी माहिती अग्निशमन दल कर्मचारी प्रसाद बोराटे यांनी काल व्हाट्स अप ग्रुपच्या माध्यमातून त्यांना दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.