Today’s Horoscope 14 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 14 January 2024
आजचा दिवस – रविवार.
तारीख 14.01.2024
शुभाशुभ विचार – क्षय तिथी.
आज विशेष – विनायक चतुर्थी.
राहू काळ – सायंकाळी 4.30 ते 06.00
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आज नक्षत्र – धनिष्ठा 10.22 पर्यंत नंतर शतकारका.
चंद्र राशी – कुंभ.
—————————–
मेष – ( शुभ रंग – राखाडी)
आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. जिवलग मित्र तुमच्या शब्दाला मान देतील दिवसाच्या उत्तरार्धात लाभ होईल.

वृषभ ( शुभ रंग- क्रीम)
आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्याला महत्त्व द्याल. कामाच्या व्यापात काही महत्त्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. कुटुंबीयांसाठी वेळ काढणे अवघड होईल.

मिथुन – ( शुभ रंग- हिरवा)
आज तुम्हाला दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची खात्रीच बाळगा. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे तुमच्या मनात येईल. वडीलधाऱ्यांच्या वयाचा मान रखाल.

कर्क – ( शुभ रंग – निळा)
हितशत्रू आज कदाचित मित्रांमध्येच लपलेले असू शकतील. कोणतीही धाडसाची कामे आज करू नका. नवीन ओळखीत लगेच विश्वास टाकू नका. सदैव सतर्क रहा.

सिंह -( शुभ रंग – पिस्ता)
कौटुंबिक वातावरण आज सामंजस्याचे असल्याने तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रातही आपले महत्त्व सिद्ध करू शकाल. अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची तुम्हाला खंबीर साथ राहील.

कन्या – ( शुभ रंग- केशरी)
आज कोणतीच गोष्ट सहज साध्य नसली तरीही तुमची काही येणी असतील तर ती मात्र आकस्मिक रित्या वसूल होण्याची शक्यता आहे. तुमच्या अथक प्रयत्नांना दैवाचे पाठबळ नक्की मिळेल.

Chinchwad : पीसीईटीच्या पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा

तूळ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहतील. हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. आज बरेच दिवसांनी जुन्या मित्रमंडळींच्या सहवासात रमाल.

वृश्चिक ( शुभ रंग – जांभळा)
आज काही घरगुती प्रश्नांत लक्ष देणे तुम्हाला अत्यंत गरजेचे वाटेल. काही रसिक मंडळी सहकुटुंब एखाद्या सहलीचे नियोजन करतील. गृहिणी मुलांच्या अभ्यासात डोकावतील.

धनु (शुभ रंग- आकाशी) Today’s Horoscope 14 January 2024
शेजाऱ्यांशी झालेले गैरसमज दूर होऊन सलोखा वाढेल. काही जणांना आज तातडीने प्रवासासाठी निघावे लागेल. घराबाहेर क्रोधावर लगाम ठेवा. मुलांनी आईच्या आज्ञेत राहावे.

मकर- ( शुभ रंग – पांढरा)
आज संध्याकाळी काही येणे अनपेक्षितपणे वसूल होईल. महत्त्वाच्या कामासाठी थोडी भटकंती होईल. वाढत्या खर्चातही आज पैशाची कमतरता भासणार नाही.

कुंभ – (शुभ रंग- मोतिया)
उपवर तरुण तरुणींना सुयोग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. एखाद्या समारंभात तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा चांगला प्रभाव राहील. आज भावनेच्या भरात तुम्ही काही चुकीचे निर्णय घेऊ शकाल.

मीन ( शुभ रंग- आकाशी)
राशीच्या व्यय स्थानातील चंद्र अनावश्यक खर्चाचे प्रमाणही वाढवेल. संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. उंची वस्त्र खरेदी कराल. आज तुम्ही गरजूंनाही सढळ हस्ते मदत कराल.

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन 9689165424

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.