Alandi : सिद्धबेटातील वृक्ष संवर्धनाकरिता सेंद्रीय खताचा वापर

एमपीसी न्यूज – सिध्दबेटामध्ये प्रवेशद्वाराजवळील परिसरात विविध प्रकारचे वृक्षारोपण ( Alandi ) विविध संस्था,व्यक्ती व पालिका प्रशासन मार्फत करण्यात आले आहे.  तेथील वृक्षांची योग्य प्रकारे वाढ व्हावी यासाठी वृक्ष वाढीसाठी अपायकारक असलेल्या वेलीचा नायनाट करण्यात आला असून छोटे मोठे गवत काढून तिथे स्वच्छता करण्यात आली आहे.

Pimpri : पिंपरीतील मराठा समाजाचे सर्वेक्षण सुरू

तेथील झाडांना पालिका प्रशासनामार्फत  पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.रासायनीक खता पेक्षा सेंद्रीय खताचा वापर केला जात आहे. सेंद्रिय पदार्थ आणि खते जमिनीचा पोत सुधारतात, ज्यामुळे ते पाणी जास्त काळ टिकून राहते आणि जमिनीत जिवाणू आणि बुरशीजन्य क्रियाकलाप वाढवतात . म्हणून, ते केवळ आपल्या झाडांनाच मदत करत नाहीत तर ते मातीला मदत करतात. दुसरीकडे, कृत्रिम खते मातीतील पोषक तत्वे कमी करतात, ज्यामुळे ती अनुत्पादक बनते.

  सिध्दबेट प्रवेशद्वार जवळील केलेल्या वृक्षारोपणा मुळे तेथील परिसर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.पालिका प्रशासनाने तेथील वृक्ष संवर्धनासाठी व स्वच्छतेसाठी विशेष लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे.यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांसह विविध व्यक्ती व संस्थाचे सहकार्य तिथे लाभत आहे.सद्यस्थितीत या परिसरात अनेक जण छायाचित्रे  काढण्यासाठी येत असल्याचे दिसून येत ( Alandi ) आहेत.
https://www.youtube.com/watch?v=FxHSp4GYwzQ&pp=ygUIbXBjIG5ld3M%3D

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.