Alandi : आळंदी शहराला पाणीपुरवठ्यालाअजूनही विलंब ; पाणी समस्येमुळे शहरात नागरिक हैराण

एमपीसी न्यूज – आळंदी शहरास पाणीपुरवठा करणारी(Alandi) पुणे महानगरपालिकेची 1700 एमएम पाईपलाईन लिकेज झाली. यामुळे गुरुवारी आळंदी शहरात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. या दरम्यान सदर पाईपलाईन लिकेज काढण्याचे काम सुरू करण्यात आले होते. परंतु, हे काम मोठ्या स्वरूपात असल्यामुळे या कामास विलंब झाला.

 भामा आसखेड पाईप लाइन मधून होणारा पाणीपुरवठा आळंदी  जलशुद्धीकरण केंद्रावर कमी दाबाने (दि.17)आज सकाळी साडे दहा वाजता सुरू झाला. यामुळे गावठाणात आज सायंकाळी पाणीपुरवठा होईल,असे पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांने सांगितले.
आळंदी गावठाणामध्ये मंगळवारी  पाणीपुरवठा करण्यात आला होता.

तर बुधवारी हवेली विभागात पाणीपुरवठा करण्यात आला होता.आळंदी मध्ये दोन विभागात  दिवसाआड पाणीपुरवठा चालू आहे.गावठाणात मंगळवार तर हवेलीला बुधवार पासून पाणीपुरवठा नसल्याने येथील अनेक नागरिकांची घरगुती विविध उपयोगासाठी पाण्या संदर्भात समस्या निर्माण झाली आहे .
पाण्याच्या या गैरसोयी मुळे नागरिक हैराण झाले आहेत.पाणी टंचाई मुळे लोकांची तारांबळ उडाली आहे. नागरिक विकतचे टँकर व आजूबाजूच्या परिसरातील कुपनलिकाद्वारे पाणी घेत आहेत.भविष्यात अश्या परिस्थितीतचा सामना करण्यासाठी पाणी नियोजनाबाबत नियोजन करणे आवश्यक (Alandi) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.