Talegaon Dabhade : आंबी ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चुरस, निकालाकडे सर्वांचेच लक्ष

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या आंबी ( वारंगवाडी-गोळेवाडी व राजपुरी )    ग्रुप ग्रामपंचायतीच्या 6 जागांसाठी 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

आंबी या ठिकाणी श्री काळ भैरवनाथ शिवशक्ती – भीमशक्ती  ग्रामविकास पॅनेल आणि श्री भैरवनाथ व पिरसाहेब ग्रामविकास पॅनेल या दोन पॅनल आणि तीन अपक्षांसह लढत होत आहे. प्रभाग तीन मध्ये सात उमेदवार तर प्रभाग चारमध्ये आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

राजपुरी येथे दोन जागांसाठी चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वारंगवाडी येथील तीनही जागा यापूर्वी बिनविरोध झाल्या आहेत. आंबी येथे सकाळ पासूनच मतदारांमध्ये उत्साह होता.मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

साडे अकरा पर्यंत केंद्र क्रमांक तीन मध्ये 45.72टक्के तर केंद्र क्रमांक चार मध्ये 51.37 टक्के मतदान झाले होते. सायंकाळी साडेपाचच्या नंतर वाॅर्ड क्र 3 मध्ये एकूण 533 मतदान झाले त्यापैकी 277 पुरूष आणि 256 स्त्रीया 82.89 मतदान झाले.  तर वाॅर्ड क्र 4 मध्ये एकूण मतदान 312 झाले असून पुरूष 163 तर स्त्रीया 149 असे 85.71टक्के मतदान झाले.  आंबी येथे 85.42 टक्के मतदान झाले.

प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेतल्याचे पहावयास मिळाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदाराने  मास्क परिधान करून मतदान केले.  सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले गेले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.