Yogi Sarkar : उत्तर प्रदेशमध्ये सर्व मदरशाची सुरुवात होणार राष्ट्रगीताने – योगी सरकारचा आदेश

एमपीसी न्यूज : उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ (Yogi Sarkar) पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर तेथील राज्य सरकारने आता मोठ्या कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे योगी सरकारने मदरशांच्या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.

योगी सरकारच्या आदेशानुसार आता मदरशांमध्ये शिक्षण सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत गाणे बंधनकारक असणार आहे. यासंदर्भात आदेशही जारी करण्यात आला आहे. गुरुवारपासूनच सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हणण्यास सुरुवात झाली आहे.

Pune News : पीओपीच्या मूर्ती तयार कराल तर खबरदार, महापालिकेचा इशारा 

उत्तर प्रदेश (Yogi Sarkar) मदरसा एज्युकेशन कौन्सिलच्या बैठकीत प्रत्येक मान्यताप्राप्त, अनुदानित, विनाअनुदानित मदरशांमध्ये आगामी शैक्षणिक सत्रापासून वर्ग सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत गाणे आणि इतर प्रार्थना करणे अनिवार्य केले जाईल, असे आदेशात म्हटले आहे.  यामध्ये सर्व शिक्षक व विद्यार्थी सहभागी होणार आहेत. माहे-रमजानमुळे मदरशांमध्ये घोषित वार्षिक सुट्टीच्या यादीत 30 मार्च 2022 ते 11 मे 2022 पर्यंत सुट्टी असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले. अशा प्रकारे 12 मे 2022 पासून म्हणजेच आजपासून नियमित वर्ग सुरू झाले आहेत.

त्याचबरोबर, नियमित वर्ग सुरू करताना प्रत्येक मान्यताप्राप्त, अनुदानित आणि विनाअनुदानित मदरशांमध्ये परिषदेच्या वरील निर्णयाचे पालन सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यूपी मदरसा शिक्षण परिषदेच्या रजिस्ट्रारच्या वतीने सर्व जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकाऱ्यांना पत्र लिहून सूचना देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.