Ambvane: आंबवणे ग्रामपंचायत हद्दीतील गोरगरिबांना एक महिन्याचे धान्य वाटप

1200 कुटूंबाना मिळाले धान्य;  आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते झाले वाटप

एमपीसी न्यूज – मुळशी तालुक्यातील  आंबवणे ग्रामपंचायत हद्दीतील गोरगरीब बाराशे कुटूंबाना सरपंच मच्छिंद्र कराळे परिवार आणि उद्योजक राजकुमार गुप्ता  यांच्या वतीने धान्य वाटप करण्यात आले.  आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते या धान्याचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम आज (मंगळवारी) ग्रामपंचायत आंबवणे येथे पार पडला.

संपूर्ण देशात  कोरोना व्हायरसचे मोठे संकट आले असून सरकारने 14 एप्रिलपर्यत लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे   हातावर पोट असलेले गोरगरीब आदिवासी बांधवाचे अतोनात हाल होत आहेत. याची दखल  सरपंच मच्छिंद्र कराळे परिवार, उद्योजक राजकुमार गुप्ता, अक्षय अरोरा, ज्ञानेश सामंत, उद्योजक गोरख शेठ कराळे ,आणि तुषार सुपर मार्केट यांनी घेतली.  आंबवणे ग्रामपंचायत हद्दीतील आंबवणे, साळतर, माजगाव, पेठ शहापूर, नांदगाव, घुसलखांब, जांभुलणे, गेलदांड, देवघर विसाघर या गावातील 600 कुटूंबाना तर बाल आशाधर आश्रम येथील अनाथ  70 मुलांना धान्याचे वाटप करण्यात आले,

तर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक नंदकुमार वाळंजू, गोविंद वर्मा यांच्या वतीने कोळवली, कुभेरी, पोंमगाव, मुळापूर, येथील  600 मजूर कामगारांना  धान्य वाटप करण्यात आले. अशा एकूण आज 1200 कुटूंबाना आज धान्य वाटप करण्यात आले,

यावेळी आमदार संग्राम थोपटे,  प्रांताधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार अभय चव्हाण, गटविकास अधिकारी संदीप जठार, आंबिव्हली सिटीचे एक्सटीव रोमी दत्ता, सीओ विशाल वर्मा, माजी सभापती कोमल वाशिवले, तलाठी प्रकाश वाघमारे, उद्योजक अशोक अरोरा, गोरक्ष कराळे, संचालक धनंजय वाडकर, गंगाराम मातेरे, दादाराम मांडेकर,सुहास गोते, सामाजिक कार्यकर्ते निलेश दगडे, अमूल शिंदे, मधुर दाभाडे, प्रकाश मानकर, महादेव सुतार, आंबवने ग्रामपंचायतचे सरपंच मच्छिंद्र कराळे, उपसरपंच गोरक्ष मेहता  माजी उपसरपंच गणेश मानकर, सदस्या संगीता नेवासकर, शोभा हिरवे,सदस्य चिमाजी तिडके, ग्रामसेवक बी.  टी.  यादव,  पोलीस पाटील गणेश दळवी, विजय हुंडारे, तंटामुक्ती अध्यक्ष गणेश वाळंज, माजी नगराध्यक्ष संजय सोनवणे, नगरसेवक नितीन अगरवाल, मावळ वार्ता फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन पारख, कुमार धायगुडे, बाळासाहेब फाटक, संजय अडसूळ, रमेश शिंदे, नवनाथ दळवी आशावर्कर आशा मोडवे यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.