Pune News : बाबासाहेब पुरंदरे नसते तर शिवाजी महाराजांची ओळख तितक्या मोठ्या प्रमाणात देशभर नसती – अमित शहा

एमपीसी न्यूज : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या शिवसृष्टीचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती दर्शवली. (Pune News) ‘बाबासाहेबांनी शिवाजी महाराज लोकांपर्यंत पोहचवले. त्यामुळे लोकांना माहिती मिळाली नाही तर लोकांना शिवाजी महाराज कळले नसते, असे वक्तव्य केंद्रीय अमित शहा यांनी यावेळी केलं.

पुण्यातील कात्रज या ठिकाणी शिवसृष्टी उभी केली आहे त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी शिंदेशाही पगडी कवड्याची माळ देऊन अमित शहा यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना अमित शहा म्हणाले, ‘ऐतिहासिक आणि महत्वपूर्ण कार्यक्रमात मला बोलावलं त्याबद्दल नमस्कार. आज जगभरातील शिवाजी महाराज शिवभक्तांसाठी मोठा दिवस आहे. आजच्या पेक्षा दुसरा दिवस मोठा असूच शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम’.

‘बाबासाहेब पुरंदरे यांना देखील नमन. त्यांनी आपलं जीवन शिवाजी महाराज जीवनासाठी समर्पित केलं. बाबासाहेबांनी शिवाजी महाराज त्यांनी लोकांपर्यंत पोहचवले. (Pune News) त्यामुळे लोकांना माहिती मिळाली नाही तर लोकांना शिवाजी महाराज कळले पण नसते, असे अमित शाहा म्हणाले.

‘एकनाथ शिंदे, तुम्ही शिवसृष्टीचं काम थांबवणार नाही हे काम देवाचं काम आहे. शिवसृष्टीचं काम ठरवलेल्या वेळेतच पूर्ण होईल असा विश्वास आहे. शिवसृष्टी पाहिली, अनेकजणनी वाचलं नसेल पण या ठिकाणी आल्यावर शिवाजी महाराज समजतील आणि काही संदेश घेऊन जातील. शिवाजी महाराज नाव नाही विचार आहे, असे अमित शाहा पुढे म्हणाले.

 

‘शिवसृष्टी प्रकल्प’ काय आहे?

‘शिवसृष्टी’ हा आशियातील सर्वात भव्य ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्प असून त्याचा पहिला टप्प्या असलेल्या सरकारवाडा या ठिकाणी कामकाजाचे ठिकाण, भव्य संशोधन ग्रंथालय, प्रदर्शनी दालन आणि बहुउद्देशीय सभागृह उभारण्यात आले आहे. शिवाय याच ठिकाणी देवगिरी, तोरणा, शिवनेरी, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, पन्हाळगड आणि विशाळगड या गड–किल्ल्यांची सफर घडविणारा ‘दुर्गवैभव’ हा भाग, (Pune News) शिव छत्रपतींच्या काळात वापरत असलेल्या शस्त्रांचे विशेष दालन ‘रणांगण’, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याची माहिती देणारे दालन आणि महाराजांची आग्रा येथून झालेली सुटका ही ऐतिहासिक घटना एका विशेष थिएटरच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. तसेच मॅड मॅपिंगद्वारे प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांचे भाषण ऐकण्याची अनुभुती देखील मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.