Mhalunge Crime : उधारीचे पैसे देतो म्हणून बोलावून घेत केली मारहाण

एमपीसी न्यूज उधारी देतो असे सांगून बोलावून घेऊन (Mhalunge Crime) एकाला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली आहे. हि घटना कुरुळी , खेड येथे शनिवारी (दि.17) युनोमोल्ड प्रा.लि. कंपनीच्या गेट समोर घडली आहे.

मधुकर रामसू चव्हाण (वय 43 रा.चिंबळी) यांनी फिर्याद दिली असून परमानंद रामसिंग अहिरबाद (वय 27 रा. कुरळी)

Pune News : गड-किल्ल्यांचा इतिहास जपण्याचे काम शासन करेल – मुख्यमंत्री

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या कपड्याच्या दुकानाच्या उधारीचे पैसे मागण्यासाठी विचारणा केली असता आरोपीने पैसे देतो म्हणून बोलावून घेतले, (Mhalunge Crime) त्याने फिर्यादीच्या उजव्या हातावर लाकडी दांडक्याने मारून हात फ्रॅक्चर केला व शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. यावरून म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.