Pune : अमित शाह यांनी घेतले ज्ञानोबा व तुकोबांच्या पालखीचे दर्शन

 

शहरात शाह यांचे दोन कार्यक्रम; बाबासाहेब पुरंदरेंची भेट घेणार! 

एमपीसी न्यूज – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेतले.  

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे आज दुपारच्या सुमारास पुणे शहरात आगमन झाले आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह पुण्यातील भाजपच्या पदाधिका-यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. अमित शाह याचे आज पुण्यात दोन कार्यक्रम आहेत. दुपारी दोन वाजता ते बालगंधर्व येथील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणा-या "आर्य चाणक्य" या विषयावर ते व्याख्यान देणार आहेत. 

 
भाजपच्या संपर्क फॉर समर्थन या अभियानाअंतर्गत अमित शाह बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेणार आहेत. पुण्यातील पुरंदरे वाड्यात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही भेट होणार आहे. याशिवाय शहरातील इतरही काही मान्यवरांच्या ते भेटी घेणार असल्याची माहिती आहे. या भेटी दरम्यान ते कोणाला भेटणार आणि त्यामागे काही राजकीय संदर्भ असतील का? याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.