गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022

Amit thackeray rally: मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांची शनिवारी शहरात रॅली

एमपीसी न्यूज: आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे उद्या (शनिवारी) शहर दौऱ्यावर येत आहेत. (Amit thackeray rally) शहरात रॅली काढणार असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. याबाबतची माहिती मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली.

मनसे नेते अमित ठाकरे यांचे पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी दुपारी 3 वाजता सांगवी येथे आगमन होणार आहे. शहरातून दुचाकी रॅली काढणार आहेत. सांगवी फाट्यापासून रॅलीला सुरुवात होईल. त्यानंतर सांगवी-रक्षक चौक-काळेवाडी फाटा-16 नंबर-डांगे चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करतील.

PCMC rally: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने घर-घर तिरंगा अभियान रॅली

तेथुन पुढे डांगे चौक-थेरगाव फाटा-थेरगाव गावठाण-ऐम ऐम कॅालेज, एम एम कॅालेज जवळ काळेवाडी विभागातर्फे अमित ठाकरे यांचे स्वागत करण्यात येईल.(Amit thackeray rally) एम एम कॅालेज – चित्तराव गणपती रोड मार्गे- केशवनगर शाळा, चिंचवडगाव-जुना जकात नाका-स्पाईन रोड-बिजलीनगर पुल-गुरुद्वारा रोड मार्गे-धर्मराज चौक- आकुर्डी रेल्वे स्टेशन असा रॅलीचा मार्ग असणार आहे. केरला भवन निगडी प्राधिकरण येथे मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. तिथे महाविद्यालयीन तरुण तरुणी व पदाधिकारी यांच्याशी अमित ठाकरे संवाद साधणार आहेत.

 

spot_img
Latest news
Related news