Earthquake In Satara: साताऱ्याला जाणवला भूकंपाचा धक्का

An earthquake of magnitude 3.5 struck Satara Maharashtra रात्री 9.33 वाजता साताऱ्याला 3.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला.

एमपीसी न्यूज- गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवत आहे. साताऱ्यालाही रविवारी रात्री भूकंपाचे हलके धक्के जाणवले. रात्री 9.33 वाजता साताऱ्याला 3.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू सातारापासून 10 किलोमीटर खाली असल्याचे सांगण्यात येते. आधीच कोरोना विषाणूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच भूकंपाचा धक्का जाणवल्याने अनेक ठिकाणी लोक घराबाहेर आल्याचे चित्र दिसले.


दरम्यान, या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त अद्याप समजलेले नाही. यापूर्वी 20 जून रोजीही साताऱ्याला भूकंपाचा धक्का जाणवला होता.

शनिवारी दक्षिण आसाममधील हेलाकंदी जिल्ह्यालाही मध्यम तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 4.2 इतकी नोंदवण्यात आली होती.


गेल्या काही दिवसांत देशातील विविध भागात सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. कधी दिल्ली, जम्मू-काश्मीर तर कधी देशाच्या पूर्वोत्तर भागात भूकंप झाल्याचे दिसून आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.