Pune: पत्नीच्या नकारामुळे संतापलेल्या पतीने केला तिच्या खूनाचा प्रयत्न

Pune: Husband tries to kill his wife in baramati नकार दिल्याचा राग आल्याने आरोपीने पत्नीला थांब तुला मारूनच टाकतो असे म्हणत घराचा दरवाजा लावला.

एमपीसी न्यूज- बारामती तालुक्यातील सस्तेवाडी येथून एक वेगळीच घटना उघडकीस आली. शरीरसंबंधाला नकार देणाऱ्या पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न पतीने केला आहे. पंचवीस वर्षीय पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (दि.18) ही घटना घडली.

अधिक माहिती अशी की, घटनेच्या दिवशी पत्नीने माझं अंग दुखत आहे आणि घरी धार्मिक कार्यक्रमही सुरू आहे, असे कारण देत पतीला शरीरसंबंधाला नकार दिला होता. नकार दिल्याचा राग आल्याने आरोपीने पत्नीला थांब तुला मारूनच टाकतो असे म्हणत घराचा दरवाजा लावला.

घरातील एका दगडाने तिच्या डोक्यात तीन ते चार वेळेस मारहाणही केली. आरोपी तेवढ्यावरच थांबला नाही. तो पत्नीच्या गळ्यावर पाय देऊन दाबू लागला.

इतक्यात घराबाहेर कोणाचा तरी आवाज झाल्याने आरोपीने पाय काढला. दरम्यान, तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.