Crime News : गंभीर गुन्ह्यात 1 वर्षांपासून फरार असलेल्या सराईताला अटक

एमपीसी न्यूज – खंडणी, अपहरण व मारामारी यासारख्या गंभीर गुन्ह्यात मागील एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी उरुळीकांचन येथून अटक केली आहे.

प्रज्वल नामदेव धवडे (वय 23, रा.भिगवण ता. इंदापुर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, काळभोर पोलिसांनी या अगोदर रोहीणी भातुलकर, तौफीक शेख, मंगेश कानकाटे, शुभम कानकाटे, साईराज कानकाटे, रुतुराज कांचन, बंटी आमले, प्रतिक लांडगे, एक अनोळखी व्यक्ती, (सर्व रा. ऊरुळीकांचन (ता. हवेली) यांच्यावर लोणी

काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.यातील प्रज्वल धवडे हा फरार होता.तो नाव बदलून व ओळख लपवून परिसरात फिरत होता.पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस अंमलदारांना आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तपास पथकातील पोलीस अंमलदार निखील पवार व बाजीराव वीर यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की, प्रज्वल धवडे हा उरुळीकांचन येथील महात्मा गांधी शाळेजवळ येणार आहे.

पोलिसांनी परिसरात सापळा रचला मात्र पोलीस आल्याची चाहूल लागताच तो त्या ठिकाणावरून पळून जाऊ लागला.त्याचा पाठलाग करुन त्यास थोडयाच अंतरावर शिताफीने पकडले.त्याला नाव विचारले असता त्याने  गुन्हा केल्याची कबुली दिल्याने आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.