Ganeshostav : पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

एमपीसी न्यूज – संपुर्ण जगात प्रसिध्द असलेल्या पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. कोरोनानंतरच्या दोन वर्षांच्या कालावधीत गणेशोत्सव मोठ्या दिमाखात होत आहे. त्यामुळे लोकांचा उत्सादसुद्दा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सकाळी साडेदहा वाजता पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या आणि मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीच्या मिरणुकीला मंडईतील टिळक पुतळ्यापासून सुरुवात झाली.

चांदीच्या पालखीत विराजमान असलेल्या गणपतीला भाविकांनी मोठ्या मनोभावे निरोप दिला. गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात कसबा गणपतीची मिरवणुक सुरु झाली. त्याचा मागोमाग मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मंडळ. तिसरा मानाचा गुरुजी तालीम मंडळ, चौथा तुळशीबाग आणि मानाचा पाचवा केसरीवाडा गणेशोत्सव मंडळ यांचे गणपती रांगेत होते.

मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती मंडळाची मिरवणुक नेहमीप्रमाणे बाजीराव रस्त्यावरुन टिळक रोड मार्गे जाणारा आहे. आज सकाळी पावसाने उघडीप दिल्याने मंडईचा परिसर गणेश भक्तांनी फुलून गेला होता. ढोल ताशांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुण्यातील गणेश मंडळे सज्ज झाली आहेत. शहराच्या विविध भागात विसर्जन मिरवणुकीची जोरदार तयारी सुरु आहे.

आजच्या मिरवणुकीमध्ये आदित्य ठाकरे सहभागी झाल्याने तरुणींची त्याभोवती मोठी गर्दी होती. अनेक जण सेल्फी काढण्याचा प्रयत्न करीत होते. त्याशिवाय अजित पवार, निलम गोरे, चंद्रकांत पाटील हे देखील मिरवणुकीत सहभागी झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.