Moshi News : हप्त्यासाठी अंडा-बुर्जी चालकाला मारहाण

एमपीसी न्यूज – अंडा-बुर्जीची हातगाडी लावण्यासाठी (Moshi News) 500 रूपये हप्ता देण्यास नकार दिल्याने एकाने हातगाडी चालकाला मारहाण करण्यात आली . ही घटना मोशी – स्पाईन रोड येथे  7 मार्च रोजी घडली.

सचिन विलास कदम (वय 33, रा. मोरे वस्ती, चिखली) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनील उर्फ अण्णा पिसाळ (रा. मोशी) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Pimpri News : शिवणेतील बंधा-यातून पाणी उचला – श्रीरंग बारणे

फिर्यादी कदम यांची स्पाईन रोडवर क्रांती चौकात अंडा-बुर्जीची हातगाडी आहे. 7 मार्च रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास कदम गाडी बंद करत असताना आरोपी पिसाळ तेथे आला. (Moshi News) हातगाडी लावण्यासाठी त्याने कदम यांच्याकडे 500 रूपये हप्त्याची मागणी केली. कदम यांनी हप्ता देण्यास नकार दिल्याने पिसाळ याने त्यांना मारहाण केली. कोयत्याने हातगाडीवरील अंड्याचे ट्रे आणि अंडी फोडून गाडीवरील साहित्य फेकून देऊन नुकसान केल्याचे पोलिसांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.