Pune news: कोथरूडमध्ये आलेल्या त्या रानगव्याच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण, प्राणीप्रेमींकडून प्रायश्चित्त सभा

एमपीसी न्यूज: पुण्याचा कोथरूड परिसरात गेल्या वर्षी एक रानगवा आला होता. या रानगव्यांचा सुटकेचा थरात सात तास चालला होता. या कालावधी दरम्यान त्याने माणसाच्या या जंगलातून जाण्याचा खूप प्रयत्न केल. नागरिकांच्या गोंगाटामुळे सैरावैरा धावणाऱ्या त्या गव्याला वाट सापडली नाही.

वनविभागाने मोठ्या शिताफीने गुंगीचे औषध देऊन त्याला ताब्यात घेतले होते. दरम्यानच्या कालावधीत त्याच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या होत्या. अशातच उपचार सुरू असताना या रानगव्याचा मृत्यू झाला होता. 9 डिसेंबर रोजी या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे.

माणसांच्या वस्तीत शिरलेल्या आणि अचानक मृत्युमुखी पडलेल्या या रानगव्यांचा स्मृतिप्रीत्यर्थ कोथरूड मधील निसर्ग व प्राणी प्रेमी मित्र परिवार आणि चेंज इंडिया फाउंडेशन कडून प्रायश्चित्त सभा आयोजित करण्यात आली आहे. कोथरूडच्या डावी भुसारी कॉलनी 9 डिसेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता या प्रायश्चित्त सभेचे आयोजन करण्यात आला आहे. हा कार्यक्रम फेसबुक लाईव्ह टेक दाखवण्यात येणार आहे. कोथरूड परिसरात या कार्यक्रमाचे फ्लेक्सदेखील लावण्यात आले आहेत.

कोथरूड परिसरात आलेला हा रानगवा पाच ते साडेपाच फुटाचा होता. अंदाजे सातशे ते आठशे किलो वजन होते. या रानगव्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खूप प्रयत्न केले. अथक प्रयत्नानंतर त्याला पकडण्यात आले. परंतु गुंगीच्या औषधांचा अतिमारा, घाबरून हृदय बंद पडणे, धावपळ आणि भूक या कारणामुळे गव्याचा मृत्यू झाला होता. या रानगव्याच्या मृत्यूला उद्या म्हणजेच नऊ डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील प्राणी प्रेमींनी या प्रायश्चित सभेचे आयोजन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.