Pune : अनिरुद्ध नाईक यांचे निधन

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेचे माजी नगरसचिव अनिरुद्ध किसन नाईक यांचे शुक्रवारी (दि. 11) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 83 होते.

त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दैनिक लोकसत्ताचे कर्मचारी परेश नाईक यांचे ते वडील होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.