Anna Bansode : अखंडित वीज पुरवठ्यासाठी पुढील 25 वर्षांचे नियोजन करा – अण्णा बनसोडे

एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभा मतदार संघात 2019-20 साली 37 लाख, 2020-21  मध्ये 3 कोटी रुपयांची कामे करण्यात आली आहेत. पिंपरी कॅम्प परिसरामध्ये सब स्टेशन, स्मार्ट मिटर बसविण्यासाठी 127 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे वीज समस्या सुटण्यास मदत होईल. अधिकाऱ्यांनी अखंडित वीज पुरवठ्यासाठी पुढील 25 वर्षांचे नियोजन करावे अशा सूचना आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांनी दिल्या.

पिंपरी विधानसभा मतदार संघातील विज समस्या सोडविण्यासाठी आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांनी नुकतीच नव्याने स्थापन झालेल्या विज वितरण समितीची बैठक घेतली. अडचणींचा व विकासकामाचा आढावा घेतला.  महावितरणचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी, भोसले, सदस्य सचिव तथा उपअभियंता गणेश चाकूरकर, सदस्य अजय चव्हाण, नितीन वाघमारे, दीपक साळवे यांच्यासह  पिंपरी व भोसरी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महावितरण अधिकाऱ्यांनी शहरातील विजसमस्या, वितरण प्रणालीतील अडचणी बैठकीत मांडल्या. महापालिकेमार्फत होणा-या सततच्या रस्ते खोदाईमुळे विद्युत केबल डॅमेज होतात. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होऊन नागरिकांची मोठी गैरसोय होते. महावितरणला डॅमेज केबलचे ठिकाण शोधण्यात बराच वेळ जातो. परिणामी, महावितरण अधिकाऱ्यांना नाहक नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याची खंत अधिकारी वर्गाने बोलून दाखविली.

Swachh Bharat Mission : ‘सिटीझन फीडबॅक’मध्ये पिंपरी-चिंचवड देशात अव्वल; सर्वेक्षणात 19 वा क्रमांक

त्यावर आमदार बनसोडे (Anna Bansode) म्हणाले,  “पुढील आठवड्यात महापालिका आयुक्तांची भेट घेतली जाईल. रस्ते खोदाईमुळे विद्युत वाहिनीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी योग्य नियोजन व्हावे, यासाठी महावितरण अधिकारी आणि पालिका आयुक्तांशी संयुक्त चर्चा करून तोडगा काढला जाईल”.  पिंपरी भागात अनेक ठिकाणी डीपी बॉक्स उघडे तसेच जमिनीत गाडले आहेत. याची दुरुस्ती तातडीने करावी असे समिती सदस्य नितीन वाघमारे यांनी  संगीत. त्यावर आढावा घेऊन तात्काळ दुरुस्ती करण्यात येईल असे कार्यकारी अभियंता साळी यांनी सांगितले. अजय चव्हाण यांनी संत तुकारामनगर, वल्लभनगर तसेच दिपक साळवे यांनी दापोडी भागातील समस्या मांडल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.