Anna Jogdand : पिंपरी-चिंचवड शहराच्या सौंदर्यात भर; पण जिवघेण्या अपूर्ण कामाचे काय?

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये केंद्रशासनाच्या स्मार्ट सिटी (Anna Jogdand) अंतर्गत अनेक विकास कामे झाली आहेत आणि ती पूर्णत्वास गेली आहेत. रस्त्याची कामे जवळपास दीड वर्षापेक्षा जास्त काळापासून चालू आहे. छोटी छोटी कामे अजूनही रखडलेली आहेत. रस्त्याच्या कडेला राडारोडा पडलेला आहे. एका बाजूला अपूर्ण कामे आणि दुसऱ्या बाजूला एक किलोमीटरपर्यंत असलेली पार्किंग, दुसऱ्या बाजूला शहराच्या सौंदर्यात भर घालणारे शुर सैनिकाचे देशाचे सामर्थ्य दाखवणारे एवढे सुंदर पेंटिंग. काढून तरी काय उपयोग? असा प्रश्न मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी केला आहे.

नवी सांगवी पिंपळे गुरवच्या बाजूला औंध मिलिटरीचे छावणी कॅम्प आहे. त्यांनी नवी सांगवी पिंपळे गुरव यांच्या बाजूने सीमा बंद बांधलेली आहे. सध्या स्मार्ट सिटी अंतर्गत लाखो रुपये खर्च करून देशाचा अभिमान वाटेल, अशी देश संरक्षणासाठी जी फायटर विमाने, रणगाडे, तोफा, हेलिकॅप्टर तसेच देशातील बंदूकधारी स्त्री व पुरुष सैनिक शत्रूच्या सैनिक काला टिपतानांचे पेंटिंग करून चित्र काढले आहे; हे बघितल्यावर नागरिक आणि विद्यार्थी यांना देशाभिमान जागा झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु, यापुढेही पेंटिंगचे काम बा.रा घोलपकडे जाणाऱ्या भारत बेकरीच्या रस्त्याच्या कडेने चालू आहे. पण, दुर्दैव असे आहे की जणू काही या ठिकाणी नागरिकासाठी पार्किंग हब केला की काय असा प्रश्न पडतो?

या एक किलोमीटरच्या पर्यंत भिंतीवर काढलेल्या चित्रामुळे देशाचे सामर्थ्य दिसते. पण, अनाधिकृत पार्किंगमुळे ते  दिसत नाही.  दुसरे असे आहे, की सिमेंटचा रस्ता पुर्णत्वाकडे जात आहे.  रस्त्याच्या कडेला ओपन जिम नागरीकांसाठी पालिकेने केली आहे. सकाळ-संध्याकाळ लहान मुले नागरीक व्यायाम करताना दिसतात. पण, अनधिकृत पार्किंगमुळे नागरिकांना त्या ठिकाणी जाता येत नाही. ओपन जिमचा फायदा घेता येत नाही. शिवाय ओपन जिमच्या बाजूला खड्डे पडलेले आहेत. तेथे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

Samaj Bhushan : मनोजभाऊ जरे युवा मंच तर्फे विविध क्षेत्रातील 250 व्यक्तींचा ‘समाज भूषण’ पुरस्कारांने सन्मान

पालिकेने पावसाळ्यापूर्वी अर्धवट कामे पूर्ण करावीत. पर्यायी पार्किंगची व्यवस्था करावी. जेणेकरून देशाचे सामर्थ्य किती बलवान आहे? हे नागरिकांच्या लक्षात येईल. केबल टाकण्यासाठी पालिकेने रस्त्याच्या कडेला डक्ट तयार केलेले आहेत. त्यामध्ये तांबडी माती टाकली आहे. तर, काही ठिकाणी डक्ट रिकामेच आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी पाणी साठवून आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. रिकामे डक्ट लवकरात लवकर बुजवावेत, अशी मागणी अण्णा जोगदंड (Anna Jogdand) यांनी पालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदनातून केली आहे.

स्मार्टसिटी प्रकल्प मुख्य कार्यकारी आधिकारी मनोज सेठीया यांनी याकडे लक्ष द्यावे असेही म्हटले आहे. आमच्या पत्राची दखल आयुक्त साहेब यांनी घेतली असून पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मेल करून सुचना दिल्या आहेत. संस्थाध्यक्ष विकास कुचेकर, शहराध्यक्ष अण्णा जोगदंड (Anna Jogdand), महिला अध्यक्ष संजना करंजावणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष संगिता जोगदंड, सचिव गजानन धाराशिवकर, सचिन काळे, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी, सा.का. गणेश वाढेकर यांच्या त्यावर सह्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.