Pune News : भाजपच्या ‘त्या’ माजी नगरसेवकावर आणखी एक गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : सुपारी देऊन जीवघेणा हल्ला घडवण्याचा तयारीत असल्याप्रकरणी आणि सध्या मोक्का अंतर्गत कारागृहात असलेला भारतीय जनता पक्षाचा माजी नगरसेवक विवेक यादव याच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात. याप्रकरणी अकबर पिरसाब शेख (वय 35) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विवेक यादव आणि त्याच्या आठ साथीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की हा संपूर्ण प्रकार नऊ जानेवारी 2020 रोजी घडला होता. कॅम्प परिसरातील जान मोहम्मद रस्त्यावर 15 ऑगस्ट चौकाजवळ हा प्रकार घडला होता. फिर्यादी अकबर शेख हे दुचाकीवरुन जात असताना आरोपी दुचाकीवरून आले. अकबर शेख चा दुचाकीला आपली दुचाकी आडवी लावून त्यांनी त्याला थांबवले.

विवेक यादव यांनी फिर्यादीला शिवीगाळ करून कमरेला असलेला कोयता दाखवला आणि तुला लय मस्ती आली आहे काय परत विवेक भाईचे विरोधात अर्ज केला तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती. फिर्यादी यांनी या प्रकरणी पोलीस ठाणे आणि पोलीस आयुक्तालयात तक्रार अर्ज केला होता.

त्यावेळी पोलिसांनी फिर्यादी आणि आरोपी यांना समोरासमोर बोलावले होते परंतु घाबरलेले फिर्यादी तेव्हा आरोपी समोर आले नव्हते. विकी यादव याच्यावर आता पोलिसांनी कारवाई केल्यानंतर तक्रार देण्यासाठी पुढे आले. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.