Pune News : समाविष्ट 11 गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी सल्लागाराची नियुक्ती

प्रस्तावित 23 गावांचा आराखडा तयार

एमपीसी न्यूज : महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 11 गावांमध्ये आणि नव्याने समाविष्ट होणार्‍या 23 गावांमध्ये पाणीपुरवठा योजना राबविण्यात सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्यात येणार आहे.  त्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार असुन 13 कोटी 2 लाख  रुपयांच्या निविदेचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजूरीसाठी ठेवण्यात आला आहे.

पालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 11 गावांमध्ये आणि नव्याने महापालिका हद्दीत समाविष्ट होणार्‍या 23 गावांमध्ये पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. या योजनेचा आराखडा, देखरेख, संपूर्ण प्रकल्प व्यवस्थापन आदी कामांसाठी तज्ज्ञ सल्लागार नेमण्यात येणार आहे.

यासाठी महापालिका प्रशासनाने निवीदा मागवल्या होत्या. निवीदा प्रक्रीयेत 7 ठेकेदारांनी भाग घेतला. त्यापैकी ठेकेदार मे. एल. एन. मालवीय इन्फा प्रोजेक्ट प्रा. लि. यांची निवीदा सर्वात कमी दराने 13 कोटी 2 लाख 64 हजार रुपयांची आली आहे. त्यामुळे हे काम मे. एल. एन. मालवीय यांच्याकडून करून घेण्याचा व त्यांच्याशी करार करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समीतीसमोर ठेवला आहे. त्याला स्थायीच्या पुढील बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.