Pimpri News : महापालिकेच्या ‘ड’, ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील रस्ते, गटर साफसफाईसाठी येणाऱ्या 46 कोटींच्या खर्चाला मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ड’ आणि ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील रस्ते, गटराच्या दैनंदिन साफसफाईसाठी तीन वर्षांकरिता 46 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यासह 72 कोटी 66 लाख रुपयांच्या विविध विकास कामास स्थायी समिती सभेत आज (बुधवारी) मान्यता देण्यात आली.

पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात स्थायी समितीची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते. आरोग्य विभागाअंतर्गत ड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील रस्ते, गटर्स यांची दैनंदिन साफसफाई करण्याचे काम श्री कृपा सर्विसेस यांना दिले आहे. या संस्थेला तीन वर्षाच्या कालावधीसाठी 20 कोटी 72 लाख 73 हजार 237 रुपये देण्यात येणार आहेत.

तर, फ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील रस्ते, गटर्स याची दैनंदिन साफसफाई करण्याचे काम परफेक्ट फॅसिलीटी सर्विसेस यांना दिले आहे. या संस्थेला तीन वर्षासाठी 25 कोटी 54 लाख 42 हजार 379 रुपये देण्यात येणार आहेत.ग क्षेत्रीय कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय बहुउद्देशीय इमारतीमध्ये फर्निचर आणि स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी 3 कोटी 83 लाख रुपये खर्च केले जाणार आहे.

निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीचे नुतनीकरणासाठी 64 लाख रुपये, प्रभाग क्रमांक 3 मध्ये पेव्हींग ब्लॉक बसविण्यासाठी 18 लाख रुपये, प्रभाग क्रमांक 5 मधील रस्त्यांची खडी मुरुम आणि बीबीएम पध्दतीने दुरुस्ती करण्यासाठी 27 लाख रुपये, पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासाठी आवश्यक उपकरण खरेदीसाठी 43 लाख रुपये, मैला शुध्दीकरण पंपींग स्टेशन मधील स्काडा प्रणालीचे चालन देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यासाठी 94 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

प्रभाग क्रमांक 32 मधील शिवाजी पार्क, कृष्णानगर परिसरात स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी 18 लाख रुपये खर्च केले जाणार आहे. तर, प्रभाग क्रमांक 3 मध्ये किरकोळ दुरुस्तींच्या कामांकरीता 19 लाख रुपये खर्च होतील. पिंपरीतील प्रभाग क्रमांक 21 मधील सुभाषनगर, संजय गांधीनगर आणि परिसरातील झोपडपट्टी भागात किरकोळ दुरुस्तीची कामे करण्यासाठी 34 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. प्रभाग क्रमांक 23 मधील स्मशानभूमी आणि घाटाच्या नुतनीकरणासाठी 83 लाख रुपये खर्च होणार आहेत.

प्रभाग क्रमांक 22 मधील ज्योतिबानगर येथील बाजीप्रभू चौक ते तापकीर मळा रस्त्यावरील विद्युत विषयक कामांसाठी 82 लाख रुपये, प्रभाग क्रमांक 7 मधील कबड्डी प्रशिक्षण केंद्रातील विद्युत विषयक कामांसाठी 1 कोटी 45 लाख रुपये, भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालील सेवा रस्ते अर्बन स्ट्रीट डिझाईन प्रमाणे विकसित करण्यासाठी 2 कोटी 26 लाख रुपये तसेच पिंपरीतील नवमहाराष्ट्र, पवनेश्वर आणि इतर मैदानावरील दिव्यांचे नुतनीकरण करण्यासाठी 91 लाख रुपये खर्च होणार आहेत. या खर्चासही स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.