Pimpri News : स्मार्ट सिटीच्या 429 कोटी 27 लाखाच्या अर्थसंकल्पास मंजुरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड संचालक मंडळाची 17 वी बैठक नुकतीच पार पडली. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या 429 कोटी 27 लाख रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. त्यात विविध विकास कामांवर 272 कोटी 81 लाख विकास कामांवर खर्च होतील. तर, 156 कोटी 46 लाख 10 हजार रुपये शिल्लक राहतील असा अंदाज वर्तविला आहे.

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळाची 17 वी बैठक महापौर उषा ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली (गुरुवारी) पार पडली. संचालक नामदेव ढाके, राजू मिसाळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील, नामनिर्देशक संचालक ममता बत्रा, सचिन चिखले, संचालक प्रमोद कुटे, स्वतंत्र संचालक यशवंत भावे, प्रदीपकुमार भार्गव, सहमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, मुख्य वित्तीय अधिकारी सुनील भोसले, कंपनी सेक्रेटरी चित्रा पवार, महाव्यवस्थापक अशोक भालकर, कार्यकारी अभियंता मनोज सेठीया, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीकांत कोल्हे उपस्थ‍ित होते.

सन 2022-23 या कालावधीसाठीच्या मुळ आर्थिक अंदाजपत्रक संचालक मंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आले. यामध्ये, SCP नुसार पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी, केंद्र शासन, राज्य शासन, महापालिका हिस्सा यांच्याकडून एकूण 1 हजार कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यापैकी प्रकल्प निधी 930 कोटी, प्रशासकीय निधी 50 कोटी स्मार्ट सिटी लिमिटेडला प्राप्त होणार आहे. त्यापैकी 783.84 कोटी निधी हा प्रकल्प आणि प्रशासकीय व कार्यालयीन खर्चाकरीता 39.84 कोटी जानेवारी 2022 अखेर प्राप्त झालेला आहे. उर्वरीत प्रकल्प निधी 186 कोटी आणि प्रशासकीय निधी 10.16 कोटी असा एकूण 196.16 कोटी भविष्यात प्राप्त होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.