रविवार, सप्टेंबर 25, 2022

Breaking News : अजित पवारांशी संबंधित 1000 कोटींची संपत्ती होणार जप्त; आयकर विभागाची मोठी कारवाई

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 1000 कोटींची संपत्ती जप्त करण्याची नोटीस आयकर विभागाकडून बजावण्यात आली आहे. अजित पवार यांच्याशी संबंधित पाच संपत्ती जप्त करण्याची नोटीस देण्यात आली आहे. त्यामध्ये एक साखर कारखाना, दक्षिण दिल्लीतील एक फ्लॅट, गोव्यातील मालमत्ता, महाराष्ट्रात 27 वेगवेगळ्या ठिकाणच्या जमीनी तसेच मुंबईतील निर्मल इमारतीचा समावेश आहे. 

या कारवाईअंतर्गंत अजित पवारांशी संबंधित कोट्यवधींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाची कारवाई झाली असून 90 दिवसांच्या कालावधीत प्रॉपर्टी बेनामी नसल्याची सत्यता सिद्ध करावी लागणार आहे. आयकर विभागानं चार मालमत्तांवर तात्पुरती जप्ती आणण्यात आल्याची माहिती आहे. गोव्यातील रिसॉर्ट, दिल्लीतील घर व दोन साखर कारखान्यांची मालमत्ता. हे साखर कारखाने अजित पवार यांच्याशी संबंधित असल्याची चर्चा आहे. ही संपत्ती जवळपास 1 हजार कोटींपेक्षा जास्त असल्याची माहिती आहे.

अजित पवार हे गेल्या काही महिन्यांपासून आयटीच्या रडारवर आहेत. गेल्या महिन्यात आयकर विभागाने दोन रिअल इस्टेट ग्रुप आणि अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घर आणि कार्यालयांवर छापेमारी केली होती. यावेळी 184 कोटींची बेहिशोबी मालमत्त्ता सापडली होती. आयकर विभागाने 7 ऑक्टोबरपासून 70 हून अधिक ठिकाणांवर छापेमारी केली होती.

कोणत्या संपत्ती जप्त करण्याचे आदेश

जरंडेश्वर शुगर फॅक्ट्री
बाजार मूल्य: सुमारे 600 कोटी

साऊथ दिल्लीमधीली फ्लॅट
बाजार मूल्य: सुमारे 20 कोटी

पार्थ पवार यांचं निर्मल ऑफिस
बाजार मूल्य: सुमारे 25 कोटी

निलय नावाने गोव्यात बनलेला रिसॉर्ट
बाजार मूल्य: सुमारे 250 कोटी

महाराष्ट्रात 27 वेगवेगळ्या ठिकाणी जमीन
बाजार मूल्य: सुमारे 500 कोटी

spot_img
Latest news
Related news