Chikhali : पूर्ववैमनस्यातून तरुणावर जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज – पूर्ववैमनस्यातून सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना मोरे वस्ती चिखली येथे गुरुवारी (दि. 2) घडली.

गणेश किशोर तोरस्कर (वय 19, रा. मोरेवस्ती चिखली) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याने या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार युवराज मावळे, अजय बनसोडे, आदित्य पवार, उमेश गवळी, यशपाल सरोदे, अक्षय चोतवे (सर्व रा. मोरेवस्ती चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश आणि आरोपी यांच्यामध्ये बुधवारी (दि १) किरकोळ कारणावरून मारहाण झाली होती. या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी गुरुवारी रात्री साडे सातच्या सुमारास गणेश याला लोखंडी कोयता दगड आणि लाकडी बांबूने मारहाण केली. यामध्ये गणेश गंभीर जखमी झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चिखली पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2
You might also like