Mumbai News : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी एकाचा आत्महत्येचा प्रयत्न 

एमपीसी न्यूज – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय बंगल्याच्या विशेष कार्यकारी अधिकारी दालनात एका व्यक्तीने अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. मंगळवारी (दि. 09) दुपारी ही घटना घडली.

पांडुरंग वाघ (रा. नेवासा, अहमदनगर) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी गावदेवी पोलिसांनी पांडुरंग वाघ यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच त्यांना अटक करुन जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाळासाहेब थोरात यांचा ‘रॉयल स्टोन’ या शासकीय निवासस्थानी एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी अडवल्याने मोठा अनर्थ टळला. वाघ यांनी शासनाकडून 2018 मध्ये वाळू उत्खनन आणि वाहतूकीचा शासकीय परवाना मिळवला होता. त्यासाठी त्यांनी शासनाकडे 8 लाख 72 हजार भरले होते. माञ स्थानिकांच्या विरोधामुळे वाळू उपसा झाला नाही. यामुळे शासनाला भरलेले पैसे परत मिळावे यासाठी वाघ हे मुंबईत आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.