Crime News : विवाहितेला गळा दाबून मारून टाकण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – विवाहितेला मारहाण करत तिचा गळा दाबून मारून टाकण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पती व सासू-सासऱ्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 31 ऑगस्ट रोजी इंद्रायणी कॉलनी येथे घडली.

याप्रकरणी पिडीत महिलेने पोलीसात तक्रार दिली असून पती अविनाश किसन गायकवाड (वय.30), सासू (वय 55), व सासरे किसन खंडू गायकवाड (वय 60) सर्व राहणार तळेगाव दाभाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला लग्नात हुंडा कमी दिला म्हणून तसेच घरातील छोट्या-मोठ्या कारणावरून आरोपी हे जानेवारीपासून त्रास देत होते. 30 ऑगस्ट रोजी हरीतालेकेच्या उपवासाने अशक्तपणा आला म्हणून फिर्यादीने सासूला स्वयंपाक करण्यास सांगितले. त्यावेळी सासूने फिर्यादीला शिवीगाळ करत स्वंयांपाक करण्यास नकार दिला व सासऱ्याने काठीने मारहाण केली.यावेळी पतीनेही मारहाण करत फिर्यादीला खाली पाडले व पाय गळ्यावर ठेऊन आज तुला मारूनच टाकतो,तुझा कायमचा विषय मिटवतो म्हणत मारून टाकण्याचा प्रयत्न केला. यावरून पती, सासरे व सासू यांच्यावर हुंड्याची मागणी करणे, विवाहितेचा छळ करत मारून टाकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दभाडे पोलीस याचा पुढील तपास करीत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.