Dehugaon News : ‘जागरूक पालक सुदृढ बालक’ अभियानाचा देहूत प्रारंभ

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य शासनाने सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत संपूर्ण राज्यात 9 फेब्रुवारी पासून जागरूक पालक सुदृढ बालकविशेष अभियान (Dehugaon News) राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. देहू प्राथमिक आरोग्य केंद्रात नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, महिला बालकल्याण समिती सदस्य  पौर्णिमा परदेशी, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.  किशोर यादव, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख सुनील हगवणे  यांच्या हस्ते या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.

राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, एकात्मिक बालविकास विभाग, शिक्षण विभाग व समाजकल्याण विभाग यांच्या समन्वयाने हे अभियान राबविण्यात ते  आहे. यामध्ये 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी, संदर्भसेवा, प्रयोगशाळा तपासण्या व आवश्यकतेनुसार उपचार तथा शस्त्रक्रिया  करण्यात येणार आहेत.

PCMC : राज्य शासनाने मागविली 43 अधिका-यांच्या पदोन्नतीची माहिती

या अभियानाच्या माध्यमातून देहू परिसरातील 0 ते 18 वयोगटातील सुमारे 11 हजार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट्य आहे. (Dehugaon News) तसेच तपासणी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक असे  एकूण 30 हजार  मोफत आभा कार्ड काढून देण्यात येणार आहे, असे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी सांगितले.

या आजारावरील तपासण्या होणार
या तपासणीमध्ये बालकांचे  दुभंगलेले ओठ आणि टाळू, जन्मजात मोतीबिंदू ,जन्मजात बहिरेपणा, डोळ्यांचा तिरळेपणा, लहान मुलांमधील हृदयविकार, कर्करोग व अशा अनेक आजारावरील तपासण्या करून  शस्त्रक्रिया  करण्यात येणार आहेत.

अभियानाची उद्दिष्टे:-
● राज्यातील 18  वर्षावरील सर्व मुला-मुलींची आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा.
● सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समूपदेशन सुविधा.
● 0 ते 18 वर्षापर्यंतच्या बालकांची/ किशोरवयीन मुला–मुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी.
● आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार.
● गरजू आजारी बालकांना संदर्भ सेवा देऊन उपचार. (उदा. औषधोपचार, शस्त्रक्रिया, ई.)
● प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा.
● सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समूपदेशन.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.