Pune News : गोपनीय माहितीच्या आधारे उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा ‘बहिर्जी नाईक’ पुरस्काराने सन्मान

एमपीसी न्युज : पुणे ग्रामीण पोलीस दलातील दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र कोरवी आणि किरण कुसाळकर यांनी गोपनीय माहितीच्या आधारे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी ‘बहिर्जी नाईक’ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.शिरूर आणि वालचंद नगर पोलीस स्टेशनच्या आरोपींकडून त्यांनी 8 पिस्टल आणि 9 राउंड हस्तगत केले होते. 

पोलीस ठाण्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मध्ये सांघिक भावना निर्माण व्हावी व रोजच्या कामामध्ये काम करण्याची निरोगी स्पर्धा असावी या उद्देशाने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दर महिन्याला बक्षीस देण्याचे ठरवले आहे. पोलीस ठाणे स्तरावर व जिल्हा स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना बक्षीस दिले जाणार आहेत. रविवारी (18 ऑक्टोबर) पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीत हे पुरस्कार संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आले.

याशिवाय संघटित गुन्हेगारी विरोधी प्रभावी कामगिरी केल्याबद्दल सहायक पोलिस अधीक्षक नवनित कावत यांचाही सन्मान करण्यात आला. कामशेत पोलीस स्टेशनच्या हद्दीतून त्यांनी 86 लाख 78 हजार रुपये किमतीचा 578 किलो गांजा जप्त केला होता.

सर्वोत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण पुरस्कार

उत्कृष्ट कामगिरीबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन आतकरे, निरंजन नरवणे यांच्यासह पोलीस कर्मचारी सकाटे, होनमाने, व्यवहारे, मारकड पिलाने, दीक्षित, जाधव, होळकर, जाधवर आणि शिंदे यांना सर्वोत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण पुरस्कार देण्यात आला.

सर्वोत्कृष्ट मुद्देमाल हस्तगत पुरस्कार

 

बारामती पोलीस स्टेशनच्या हद्दीत 312 किलोचा गांजा जप्त केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, सहाय्यक पोलीस निरीक्षक लंगुटे, पोलीस कर्मचारी विनोद लोखंडे, नंदू जाधव, मंगेश कांबळे प्रशांत राऊत यांना सर्वोत्कृष्ट मुद्देमाल हस्तगत पुरस्कार देण्यात आला. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.