Baramati News  : गुरुवारी बारामती शहरातील वीजपुरवठा बंद

एमपीसी न्यूज  –  बारामती शहरातील महावितरणच्या वीज उपकेंद्रामध्ये करावयाच्या नियोजित व महत्वाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी (दि. 29) बारामती शहरासह औद्योगिक वसाहतीमधील वीजपुरवठा काही काळ बंद राहणार असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

बारामती शहरातील सहा वीज वाहिन्यांची देखभाल दुरुस्तीची कामे गुरुवारी (दि. 29) सकाळी 10 ते 5 यावेळेत केली जाणार आहेत. तर औद्योगिक वसाहतीमधील वाहिन्यांची देखभाल दुरुस्ती सकाळी 10 ते दुपारी 3 यावेळेत केली जाणार आहे. वेळेपूर्वी दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला जाणार असून, काम होताच नियोजित वेळेपूर्वी सुद्धा वीजपुरवठा पूर्ववत केला जाऊ शकतो. तरी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण बारामती शहर उपविभागातर्फे करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.