Nigdi News : भक्ती शक्ती चौक ते देहूरस्ता बीआरटीएस मार्ग आज सायंकाळी सहा पर्यंत राहणार बंद

एमपीसी न्यूज – भक्ती शक्ती चौक ते देहूरस्ता दरम्यान व्हिजन प्लस इमारतीजवळ बीआरटीएस मार्गातील जलवाहिनी फुटली आहे. (Nigdi News) ती दुरुस्त करण्यासाठी बीआरटीएस सर्व्हिस रस्ता रविवारी (दि.4) सकाळी आठ ते सायंकाळी सहा या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे.

पुण्याकडून येणारी वाहतूक देहूरोडकडे न जाता भक्ती शक्ती सर्कल चौकातून डावीकडे वळून काचघर चौक-भेळ चौक-संभाजी चौक-बिजलीनगर ब्रिजवरून आहेर गार्डन मार्गे रावेत येथून इच्छित स्थळी जाईल.

Chinchwad News: डॉ. कोत्तापल्ले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी शोकसभा

ट्रान्सपोर्टनगर कडून येणारी व देहूरोडकडे जाणारी वाहने टिळक चौकाकडे न जाता भक्ती शक्ती सर्कल चौकातून उजवीकडे वळून काचघर मार्गे (Nigdi News) भेळ चौक-संभाजी चौक-बिजलीनगर ब्रिजवरून-आहेर गार्डन मार्गे रावेत येथून इच्छित स्थळी जातील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.