Bhima Koregaon : भीमा कोरेगाव येथील मानवंदना कार्यक्रमासाठी प्रशासनाच्या वतीने मार्गदर्शनपर व्हिडिओ प्रसिद्ध

एमपीसी न्यूज : 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव (Koregaon Bhima) जयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी अनेक अनुयायी भीमा कोरेगाव येथे जमा होतात. आगामी जयस्तंभ, भीमा कोरेगाव (पेरणे फाटा) या ठिकाणी पार पडणाऱ्या मानवंदना कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे जिल्हा पोलीस दलाकडून WALK THROUGH (व्हिडिओ) बनविण्यात आला असून या व्हिडिओला प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिद्धी देण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लाखो अनुयायी राज्याच्या व देशाच्या विविध भागातून 1 जानेवरी रोजी प्रत्येक वर्षी भीमा कोरेगाव येथे येतात. बरेच लोक खाजगी चारचाकी, दुचाकी, बस आणि इतर वाहनाने येतात. तर, काही लोक सार्वजनिक बसने येत असतात. त्यामुळे खाजगी वाहनांना जयस्तंभपासून दूरवर पार्क करण्यास सांगितले जाते. तसेच, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या परिसरात तैनात असतो.

Nigdi News: पवळे क्रीडांगण क्रीडा स्थापत्य विभागाकडे वर्ग करा – सचिन चिखले

या व्हिडिओमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे – Bhima Koregaon

1) या व्हिडिओमधून मानवंदन देण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सोयीसुविधा, वाहतूक बदल व जड वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाची माहिती देण्यात आलेली आहे.

2) भाविकांनी कोणत्या मार्गाचा वापर करून जयस्तंभ अभिवादनासाठी पोहोचायचे आहे? याबाबत माहिती दिलेली आहे.

3) जड वाहतुकीसाठी कोणत्या पर्यायी मार्गाचा वापर करावा ते दाखविलेले आहे.

4) भाविकांसाठी व्यवस्था व तेथून जयस्तंभापर्यंत मानवंदनेसाठी कसे जायचे व परत कसे वाहनतळापर्यंत यायचे ते नमूद केले आहे.

5) जयस्तंभ मानवंदना कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन व समाज माध्यमांद्वारे करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.