Bhosari : पैसे देण्यास नकार दिल्याने दाम्पत्यास दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज – पैसे देण्यास नकार दिल्याने एका दाम्पत्याला दगडाने मारहाण केली. तसेच एका दुचाकीची तोडफोड करून नुकसान केले. ही घटना बोपखेल येथे सोमवारी (दि. 16) दुपारी चारच्या सुमारास घडली.

दिनेशकुमार रामसहाय सिंह वय 43, रा. गिरीजापती निवास, रामनगर, बोपखेल) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राहुल भगत (वय 23), निहाल भगत, राहुल सौदे, कार्तिक जिंदाल (सर्व रा. रामनगर, बोपखेल) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास फिर्यादी दिनेशकुमार यांचा भाऊ सुतारकाम करीत होता. त्यावेळी आरोपी राहुल भगत याने त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. मात्र, दिनेशकुमार यांनी पैसे देण्यास नकार दिला.

या कारणावरून संतापलेल्या आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी व त्यांच्या पत्नीस दगड मारून जखमी केले. तसेच एका दुचाकीवर (एमएच 14 / जीएम 3163) दगडफेक केली. तसेच कोणत्यातरी टोकदार साधनाने मारून दुचाकीचे नुकसान केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.