Bhosari : भोसरीत शास्त्रीय नृत्याचे मनोहारी दर्शन

एमपीसी न्यूज – मनमोहक शास्त्रीय नृत्याद्वारे देवमुद्रा संस्थेच्या विद्यार्थिनींनी सलंगई पूजा संस्मरणीय केली. एकल आणि सांघिक भरतनाट्यम नृत्यातून पारंपरिक रचना सादर करण्यात आल्या. पदलालित्य आणि भावमुद्रांनी शास्त्रीय नृत्यातून पैलू कपिला नृत्य अॅकॅडमीच्या संस्थेने भरतनाट्यम अरंगत्रेम कार्यक्रम नुकताच आयोजित केला होता.

भोसरीतील अंकुशराव लांडगे सभागृहात नुकताच हा कार्यक्रम रंगला. यावेळी प्रमुख पाहुणे लिला पूनावाला, नंदकिशोर कल्चरल संस्थेचे डॉ. नंदकिशोर, श्रीमती कीर्ती डेंभे आदी उपस्थित होते.

  • भरतनाट्यम नृत्याच्या पुष्पांजली गणपती कौत्वकम रंगाजली या पारंपरिक रचनांचे वेधक सादरीकरण विद्यार्थिनींनी केले. संपूर्ण नृत्याचा आनंद देणारे व उंची गाठणारे अलारिपू नृत्य अधिक उठावदार झाले. नृत्याचा कळस गाठताना कलाकारांनी उत्कृष्ट नृत्य केले. या प्रकाराला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अलारिपू, पुष्पांजली, र्णनम, पदम, कीर्तीनम, तिल्लाना, मंगलम या नृत्यातून कथानक उलगडत कलाकारांनी कार्यक्रमाला वेगळी उंची मिळवून दिली.

साथसंगत नट्टूवंगम गुरु चिप्पी पद्मकुमार, व्होकल रोहन पिल्लाई, मृदुंगम एच. व्यंकटारामण, व्हायोलिन बालसुब्रमण्यम आर शर्मा, फ्ल्युट सुनील अवचट, इडक्का राजेश मरार यांनी केली. तर सूत्रसंचालन संदीप साकोरे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.