Pimpri : मोदी सरकारमुळे कामगार क्षेत्र अस्थिर झाले – सचिन साठे

जागतिक कामगार दिनानिमित्त शहरातील असंघटित कामगारांचा सत्कार

एमपीसी न्यूज – मोदी सरकारने कामगार कायद्यात बदल करून देशभरातील कामगार क्षेत्र अस्थिर केले आहे. कामगारांचे न्याय्य हक्क संपुष्टात आणून भांडवलदारांचे खिसे भरले आहेत. मोदींमुळेच विजय मल्ल्या, निरव मोदी, मेहुल चोक्सी सारखे अनेक भांडवलदार देशातील बँकांचे पैसे बुडवून परदेशात पळून गेले. बीएसएनएल, जेट एअर वेजमधील कामगार बेरोजगार झाले. वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याऐवजी पाच वर्षात साडेचार कोटींहून जास्त कामगार बेरोजगार झाले. नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था धोक्यात आली. जीएसटीमुळे उद्योग व्यवसाय बंद झाले. सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविरुद्ध आता देशभर लढा उभारला पाहिजे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड असंघटित कामगार काँग्रेसच्या वतीने जागतिक कामगार दिनानिमित्त शहरातील असंघटित कामगारांचा पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

  • यावेळी असंघटित कामगार काँग्रेसचे अध्यक्ष सुंदर कांबळे, महिला अध्यक्ष शीतल कोतवाल, तारिक सैय्यद, नितीन पटेकर, निर्मला कुसाळकर, मकर यादव, अनिरुद्ध कांबळे आदींसह विविध असंघटित कामगार बंधू भगिनी उपस्थित होते.

यावेळी सचिन साठे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी विविध पदांची नियुक्‍ती पत्रं देण्‍यात आली. यामध्‍ये उमा शेख यांना पिंपरी विधानसभा अध्‍यक्ष, सत्‍वशिला इटकर यांना भोसरी विधानसभा अध्‍यक्ष, सविता धांडे यांना उपाध्‍यक्ष नियुक्‍त करण्‍यात आले.

  • पुजा चंडालिया यांना प्रभाग क्र. १९ भाटनगर चे अध्‍यक्ष तर सीमा वाल्‍मिकी यांना उपाध्‍यक्ष पदाचे पत्र देण्‍यात आले. यावेळी काशीबाई तोरड, पोपट पवार, शितल दणके, नवसाजी रसाळ, कस्‍तुरबाई चौगुले, मुक्‍ता देवकर, पुष्‍पा वाल्‍मिकी, सुनिता सुर्यवंशी या कामगार बंधू भगिनींचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन शितल कोतवाल प्रस्‍तावना सुंदर कांबळे यांनी केली. आभार तारिक सय्‍यद आभार यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.