Bhosari : पार्क केलेली गाडी काढायला लावली म्हणून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज – पार्क केलेल्या चारचाकीमुळे (Bhosari) अडचण झाल्याने ती काढायला सांगितली, म्हणून लोखंडी रॉडने एका तरुणाला मारहाण केली. ही घटना शनिवारी रात्री भोसरीतील चक्रपाणी वसाहत येथे घडली. 

याप्रकरणी पोलिसांनी रामकिसन डोईफोडे (वय 42, राहणार चक्रपाणी वसाहत भोसरी) याला अटक केली असून अंबादास विठ्ठल कानडे (वय 26, राहणार भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याची चारचाकी लावल्यामुळे अडचण निर्माण झाल्याने फिर्यादी यांच्या आईने आरोपीला त्याबाबत सांगितले. यावेळी आरोपीचा मुलगा सुदर्शन डोईफोडे याने हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

यावेळी फिर्यादी तेथे आले असता त्यांच्यात धक्काबुक्की झाली. तू (Bhosari) माझ्या मुलाला हात का लावला असे म्हणत आरोपीने त्याच्या टेम्पोमध्ये ठेवलेला लोखंडी रॉड काढत फिर्यादीच्या पायावर डोक्यावर मारून त्याला गंभीर जखमी केले. यावरून पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Pimpri : छत्रपती शाहूंनी पुरोगामी विचारांचा पाया भक्कम केला- ॲड लक्ष्मण रानवडे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.