Bhosari : किरकोळ कारणावरून एकाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – रात्रीचे जेवण झाल्यानंतर घराबाहेर हात धुण्यासाठी आलेल्या व्यक्तीला एकाने किरकोळ कारणावरून मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 18) रात्री दहाच्या सुमारास शांतीनगर झोपडपट्टी भोसरी येथे घडली.

गुणवंत दादाराव गंगावणे (वय 55, रा. शांतीनगर झोपडपट्टी, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनिल गायकवाड (रा. शांतीनगर झोपडपट्टी, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दहाच्या सुमारास रात्रीचे जेवण झाल्यानंतर हात धुण्यासाठी घरासमोर जात होते. त्यावेळी त्यांच्या घराजवळ राहणारा आरोपी अनिल त्यांच्या घरासमोरून जात होता. ‘माझ्याकडे रागाने का पाहतो?’ असे म्हणत अनिल याने गुणवंत यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तसेच बाजूला पडलेला सिमेंटचा गट्टू गुणवंत यांच्या डोक्यात मारला. यामध्ये गुणवंत जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.