Bhosari : कारची काच फोडून रोख रक्कम व कागदपत्रे चोरीला

एमपीसी न्यूज- पार्क केलेल्या कारची काच फोडून (Bhosari) कारमधून रोख रक्कम व कागदपत्रे चोरली आहेत. ही घटना गुरुवारी ( दि.5) भोसरी येथे घडली.

Rahatani : आदर्शमाता दिवंगत भागुबाई बळीराम कोकणे यांच्या स्मृतीप्रित्यार्थ सात दिवस प्रवचनसेवा

याप्रकरणी विजय पुंडलिक सोनवणे (वय 52 रा पिंपळे सौदागर) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी भोसरीतील मंकीकर हॉस्पिटलच्या समोर त्यांची कार पार्क केली होती. यावेळी चोरट्याने कारच्या खिडकीचा काच फोडून कार मध्ये ठेवलेले 48 हजार रुपये रोख व कागदपत्रांची बॅग आसा ऐवज चोरून नेला.

फिर्यादी परत आले असता हा सारा प्रकार निदर्शनास आला. भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस चोराचा शोध घेत (Bhosari) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.