Bhosari Crime News : दिघी रोड येथील घरफोडीत 48 तोळे दागिने लंपास

एमपीसी न्यूज – दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी सात लाख 22 हजार 500 रुपयांचे 48 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना दिघी रोड, भोसरी येथे शनिवारी (दि. 3) सायंकाळी उघडकीस आली.

दीपक रमेश ओसवाल (वय 38, रा. सॅंडविक कॉलनी, दिघी रोड, भोसरी) यांनी रविवारी (दि. 4) याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओसवाल यांचे घर 1 जुलै रोजी सायंकाळी सहा ते शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान कुलूप लावून बंद होते. दरम्यान चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटला. चोरट्यांनी घरात प्रवेश करून लाकडी कपाटाचे कुलूप तोडून आतील 482 ग्रॅम वजनाचे सात लाख 22 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.