_MPC_DIR_MPU_III

Bhosari Crime News: आई-वडिलांना मारून टाकण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

एमपीसी न्यूज – आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत एका तरुणाने अल्पवयीन मुलीला इमारतीच्या टेरेसवर नेऊन हात पाय बांधून तिच्यावर बलात्कार केला. ही घटना 27 जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजता घडली असून याबाबत ७ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_IV

संदीप राजू भूतके (वय 29) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याबाबत पीडित मुलीच्या पालकांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची पत्नी दोघेही मजुरीचे काम करतात. 27 जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे ते मजुरीच्या कामासाठी गेले होते. त्यावेळी त्यांची अल्पवयीन मुलगी घरी एकटीच होती. त्यावेळी आरोपीने ‘टेरेसवर चल. नाहीतर तुझ्या आई वडिलांना मारून टाकीन’ अशी धमकी देऊन मुलीला टेरेसवर नेले.

टेरेसवर नेऊन मुलीच्या ओढणीने तिचे हात, पाय बांधून तिच्यावर बलात्कार केला. घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास आई वडिलांना मारून टाकीन, अशी पुन्हा धमकी दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

भोसरी पोलीस तपस करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.