Bhosari : महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून भोसरीचा विकास होत आहे – आमदार लक्ष्मण जगताप

भोसरी विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा सपाटा सुरूच

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघात अनेक विकासकामे झाली आहेत. आता आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून भोसरी विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामे होत आहेत. अनेक विकास प्रकल्प सुरु आहेत. अनेक प्रकल्प पूर्ण झाले आहेत. तर अनेक विकासकामे आमदार लांडगे यांच्या अजेंड्यावर आहेत, असे मत आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केले.

भोसरी विधानसभा मतदार संघात विविध विकासकामांचा सपाटा सुरु आहे. आज (रविवारी) मोशी येथे वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाअंतर्गत रिकव्हरी प्लांटचे उदघाटन, चिखली येथे शाळेच्या इमारतीचे उदघाटन, जलशुद्धीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन, इंद्रायणीनगर येथे उद्यान आणि सावता माळी उद्यानात व्यायामशाळेचे उद्घाटन करण्यात आले. आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून ही विकासकामे होत आहेत.

उद्घाटन समारंभ आणि भूमिपूजन कार्यक्रमावेळी आमदार लक्ष्मण जगताप बोलत होते. यावेळी आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, नगरसेवक कुंदन गायकवाड, नगरसेविका स्वीनल म्हेत्रे, साधना मळेकर, वसंत बोराटे, अश्विनी जाधव, नितीन बो-हाडे, साधना तापकीर, निखिल कळकुटे, गीता मेहांद्रु, नम्रता लोंढे, संतोष जाधव, वसंत लोंढे, सुरेश म्हेत्रे, ई प्रभाग अध्यक्ष सुवर्णा बुर्डे आदी उपस्थित होते.

मोशी कचरा डेपो येथे वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाअंतर्गत रिकव्हरी प्लांट सुरु करण्यात आला आहे. शहरातून एकत्रित येणारा ओला आणि सुका कचरा या प्लांटमध्ये वेगळा करण्यात येणार आहे. ओल्या कच-यातून कंपोस्ट खत तयार करण्यात येणार आहे. चिखलीमधील महापालिकेच्या शाळेची डिजिटल इंडिया अभियानात निवड झाली. या अभियानाअंतर्गत शाळेचे डिजिटलायझेशन करण्यात आले आहे. डिजिटल शिक्षणाची साथ मिळाल्याने शाळेला नवीन उजाळा मिळाला आहे. याचेही उद्घाटन करण्यात आले.

चिखली आणि परिसरातील काही गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश झाला. या समाविष्ट गावांची लोकसंख्या लक्षात घेत आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून आंद्रा मावळ धरणातून पाणी आणण्यात येत आहे. या पाण्यावर प्रक्रिया करून ते नागरिकांना पिण्यासाठी देण्यात येणार आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि आमदार लांडगे यांच्या प्रयत्नातून चिखली येथे 100 एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. हा जलशुद्धीकरण प्रकल्प दोन टप्प्यात होणार असून एकूण 350 एमएलडी क्षमतेचा हा जलशुद्धीकरण प्रकल्प असून पहिल्या टप्प्यात 100 एमएलडी क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येत आहे.

इंद्रायणीनगर सेक्टर चार येथे कै. पै. भगवान (तात्या) लोंढे या उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. इंद्रायणीनगर आणि परिसरातील हे पहिलेच गार्डन आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना आणि मुलांना या उद्यानाचा सुखद अनुभव होणार आहे. स्थानिक नगरसेविका नम्रता लोंढे यांनी याबाबात पाठपुरावा केला. आमदार महेश लांडगे यांनी याबाबत निर्णय घेत उद्यानाचा प्रश्न मार्गी लावला आहे. प्लॉट हस्तगत करण्यापासून ते उद्यानाच्या पूर्णत्वापर्यंत आमदार लांडगे यांनी मदत केली आहे. त्याबरोबर सावता माली उद्यानाजवळ महिला-पुरुष व्यायामशाळेचे देखील उद्घाटन करण्यात आले. सदृढ आरोग्यासाठी परिसरातील नागरिकांना या व्यायामशाळेचा निश्चित उपयोग होणार आहे.

‘व्हिजन 2020’ ची पूर्णत्वाकडे वाटचाल

आमदार महेश लांडगे यांनी भोसरीच्या चौफेर विकासासाठी ‘व्हिजन 2020’ हा संकल्प सोडला आहे. त्याअंतर्गत त्यांनी अनेक विकासकामे, नवीन प्रकल्प यांच्या माध्यमातून भोसरीला नवा चेहरा देण्याचा ध्यास घेतला आहे. व्हिजन 2020 अंतर्गत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र, कच-याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी वेस्ट टू एनर्जी पकल्पांतर्गत रिकव्हरी प्लांट, डिजिटल शाळा, व्यायामशाळा, उद्याने यांचा समावेश आहे. विविध प्रकारच्या विकासकामांचे उदघाटन झाले असून काही कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. पुढील काही कालावधीत ही कामे देखील पूर्ण होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.