Bhosari : सोन्याच्या दुकानातून चार तोळ्याचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज – भोसरीमध्ये सोन्याच्या दुकानातून दोन महिलांनी विक्रेत्याची नजर (Bhosari) चुकवून 4 तोळे 2 ग्रॅम वजनाचे सोने चोरले. ही घटना भोसरीतील न्यू श्रद्धा ज्वेलर्स येथे घडली आहे.

या प्रकरणी राहूल बाळासाहेब रसाळ (वय 42, रा.भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून दोन अनोळखी महिला विरोधात तकार दाखल केली आहे.

Railway : दिवाळीनिमीत्त मध्य रेल्वेच्या 500 गाड्यातून 26 लाख प्रवाशांना करता येणार प्रवास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याकडे दोन महिला सोने खरेदीच्या बहाण्याने दुकानात आल्या त्यांनी फिर्यादी यांची नजर चुकवून 42 ग्रॅम वजनाचे 2 लाख 40 हजार 240 रुपयांचे सोन्याचे (Bhosari) दागिने चोरून नेले. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.