Bhosari : पत्नीच्या मृत्यू प्रकरणी पतीला अटक

एमपीसी न्यूज – पतीने पत्नीला रुग्णालयात दाखल केले असता तिचा (Bhosari)उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, विवाहितेच्या वडिलांनी जावयाच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 11) भोसरी येथे उघडकीस आली.

अजय बालाजी हिवराळे (वय 25, रा.भोसरी, मुळ रा. नांदेड) अये अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मयत महिलेच्या वडिलांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Pimpri : ‘वॉर्ड अ‍ॅण्ड सिटी हेल्थ अ‍ॅक्शन प्लॅन’ अंतर्गत टास्क फोर्स

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारी यांनी दिलेल्या (Bhosari) माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी आणि आरोपी अजय यांचा फेब्रुवारी 2022 मध्ये विवाह झाला. विवाहानंतर ते काही दिवस नांदेड जिल्ह्यातील जांबळी या गावी राहिले. लग्नाच्या काही दिवसानंतर अजय याने पत्नीकडे माहेरहून घरखर्च आणि ऐशो आरमासाठी पैसे आणण्याची मागणी केली. त्यावरून त्याने पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. तसेच चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेला शिवीगाळ आणि मारहाण केली.

दरम्यान, शनिवारी सकाळी अजय याने पत्नीला रुग्णालयात दाखल केले. मात्र तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणात पोलिसांना संशय आला तसेच अजय याचे सासरे यांनी पोलिसात तक्रार दिल्याने पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अजय याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.