Chakan : रस्ता ओलांडत असताना कारच्या धडकेत नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रस्ता ओलांडत असताना (Chakan) एका नागरिकाचा कारच्या धडकेत मृत्यू झाला आहे. यावरून कारचालकावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात रविवारी (दि.12) सायंकाळी चाकण येथील दावड मळा येथे घडला आहे.

याप्रकरणी विश्वनाथ गुनाधर पात्र (वय 27 रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सचिन सुभाष लोंढे (रा. वराळे, खेड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात संजय झाडेश्वर गिरी (वय 44 रा. चाकण( यांचा मृत्यू झाला आहे.

Bhosari : पत्नीच्या मृत्यू प्रकरणी पतीला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या गावातील संजय गिरी हे पायी रस्ता ओलांडत होते. यावेळी आरोपीने त्याच्या (Chakan) ताब्यातील इर्टीगा कार ही भऱधाव वेगात आणली. आरोपीच्या कारची संजय गिरी यांना जोरदार धडक बसली. यात संजय यांच्या डोक्याला व छातीला गंभीर मार लागला. यातच संजय यांचा मृत्यू झाला. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून चोकण पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.