Khed : मजुरीचै पैसे मागितले म्हणून मजुराला मारहाण करत दुचाकीचे केले नुकसान

एमपीसी न्यूज – मजुरीचे पैसे मागितले (Khed) या रागातून चार ते पाच जणांनी मजुराला व त्याला मुलाला मारहाण करत त्यांची दुचाकी व मोबाईलचे नुकसान केले. ही घटना शनिवारी (दि.11) वाहगाव ता. खेड येथे घडली आहे.

याप्रकरणी गुलाब रामभाऊ पांगळे (वय 50 रा. वाहगाव, खेड) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी समीर कोळेकर, त्याचा भाऊ, व इतर दोघे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Chakan : रस्ता ओलांडत असताना कारच्या धडकेत नागरिकाचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मजुरीचे पैसे मागण्यास गेले असता आरोपींनी फिर्यादीला व त्यांच्या मुलाला (Khed) मारहाण केली. तसेच त्यांच्या दुचाकीची तोडफोड करत मोबाईल देखील फोडला. यावरून महाळुंगे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.