Bhosari : नाट्यगृह जवळून दुचाकी चोरणाऱ्या चोराला अटक

एमपीसी न्यूज – भोसरीतील अंकुशराव नाट्यगृह (Bhosari ) जवळून दुचाकी चोरणाऱ्या चोराला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. ही चोरी 2 नोव्हेंबर रोजी घडली होती. पोलिसांनी दहा दिवसात चोराला शोधून त्याला अटक केली आहे.

याप्रकरणी हेमराज जेम विश्वकर्मा (वय 34 रा.भोसरी) यांनी रविवारी (दि.12) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून निलेश पुंडलीक चव्हाण (वय 23 रा.जळगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे.

Khed : मजुरीचै पैसे मागितले म्हणून मजुराला मारहाण करत दुचाकीचे केले नुकसान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची दुचाकी अंकुशराव नाट्यगृह येथे त्यांची दुचाकी पार्क केली होती. चोराने (Bhosari ) मोठ्या शिताफीने दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरली होती. पोलिसांनी या तक्रारीवरून चोराला शोधून त्याला अटक केली आहे. याचा पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.