Bhosari News : गुळवेवस्ती येथे तरुणाचा निर्घृण खून

एमपीसी न्यूज – तरुणावर शस्त्राने वार करून खून केल्यानंतर मृतदेह ओळखता येऊ नये यासाठी दगडाने चेहरा ठेचून विद्रुप केला. ही घटना सोमवारी (दि. 17) रात्री उशिरा गुळवेवस्ती, भोसरी येथे उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा गुळवेवस्ती येथे एक तरुण जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. एका तरुणाच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केले. तसेच त्याची ओळख पटू नये यासाठी दगडाने चेहरा ठेचून विद्रुप केल्याचे समोर आले. त्यामुळे खून झालेल्या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.