Bhosari News: एमआयडीसीतील महिलांसाठी सुरु होणार पीएमपीएमएल बस

एमपीसी न्यूज – एमआयडीसीतील महिला कामगारांसाठी 22 ब्लॉक मध्ये बस सेवा सुरू होणार असल्याचे पिंपरी-चिंचवड इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले.

भोसरी एमआयडीसी परिसरात पन्नास हजार ते एक लाख महिला कामाला येतात. परंतु, गेली पन्नास वर्षात अंतर्गत बस वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात प्रश्न असून या महिलांना लांबच्या अंतरावरून चालत चालत प्रवास करावा लागतो.

त्यामुळे त्यांचा वेळही वाया जातो आणि कष्टही पडतात. तसेच संध्याकाळी कामावरून सुटल्यानंतर घरी जाताना महिलांना अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागते.

अनेक वेळा त्यांचे मोबाईल हिसकावू नेणे,  एकाच रिक्षामध्ये 6/7 महिलांना प्रवास करावा लागतो. त्यामुळे अपघाताची सुद्धा प्रमाण मोठ्या प्रमाणात असून त्याचा मोठा परिणाम महिलांच्या मानसिकतेवर होत आहे.

ही समस्या सोडविण्यासाठी बस मार्ग तयार केला असून आणि कंपनीतर्फे त्यास प्रोत्साहन मिळाले. नुकतेच पीएमपीएलच्या अध्यक्षांना पत्र देऊन याबाबत बस सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न चालू केला आहे.

एमआयडीसी परिसरात 22 ब्लॉक मध्ये ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.  लवकरच बसची सुविधा महिलांना मिळेल असे अभय भोर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.